माझं खूळ प्रेम.....
माझं खूळ प्रेम.....
गोष्ट तिची न आम्हा तिघांची
सुरुवात माझी, पण शेवट .................माहीत नाही
पाचव्याच वर्गात होतो त्यामुळे कळत काहीच नव्हतं पण वळत मात्र सारच होत,
कदाचित चित्रपट मालिकेचा हा परिणाम असावा पण कोण जाणे मनाचाही त्यात काही भाग असावा
माझ्या या नाटकाचा भाग तीनच का बनाव
कदाचीत तीच ते मनमोकळं बोलणं , हसन नि हसवन या मागचं कारण असावं......
मोठ्यासारखं माझं अनुसरण चालू होतं
पुस्तकातलं मन आता तिच्यात गुंतल होत
आत्ता पर्यंतचा अभ्यास होता स्वतः साठी
पण आता तो चालू झाला तिच्या नजरेत येण्यासाठी.....
तिला ते कळायचं की नाही ते माहीत नव्हतं
त्या गोष्टी आठवल्या की आज स्वतः वरच हसू येत
तिच्या गलीतल ते चकरा मारणं ,
तिच्या घरासमोर बसणं
तिच ते कामानिमित्त फिरणं,
पण ती माझ्यासाठीच फिरते म्हणून माझ वरवर चढण
दिवसा मागून दिवस लोटले , माझे हे नाटक असेच सुरु राहिले
आता या नाटकात एका नवीन पात्राची भर पडली कदाचित त्याला तिच्या रूपाची भुरळ पडली.....
आता तिच ते बोलणंच मला बोचू लागल
तीच ते हसन माझी थट्टा उडवू लागलं
अभ्यासातून माझं मन पूर हद्दपार झालं
पण आता समजल आपल कुठे चुकलं ........
अशाच खिन्न मनानं माझं शहराकडे प्रस्थान झाल
तिच्या पासून दूर जाऊनच आता थोडं भान आलं
पण करता काय ? नशीब फुटक निघालं...
आर्थिक अडचणीमुळे गावात वापस बोलावलं
आता शाळेतल ते नाटक पुन्हा सुरू झालं
तिच अन त्याच कुठपर्यंत आल याचा शोध काढायचं मी ठरवलं...
आणि या शोधानेच मन पुन्हा त्या दृष्ट चक्रात अडकलं
आज मला मात्र स्वतः चाच राग आला
कारण मी माझ्या प्रेमावरच संशय बाळगला
तेंव्हा लगेच मला बरोबर असल्याची जाणीव झाली
कारण मला माझ्या मनाने सातव्या वर्गातल्या एका प्रसंगाची आठवण करून दिली...
माझ्या देखत तिने एका फोटोवरच फूल त्याला दिल
तेंव्हाच वाटल होत मला आपल काही तरी हरवलं...
पुन्हा एकदा नववीत एक नवीन झटका बसला
कारण वर्गातला तो सर्वात साधा पण तिच्याच प्रेमात फसला...
हा प्रकार पाहून माझ मन मला बोललं
योग्या, तिच्यामुळे अशाच मन डोल ल ,
मग तू तर......
माझं मन तर तिच्या मागे होतं
पण तीच हृदय कुण्या दुसऱ्यात तर अडकलं नव्हतं?????
विचारायच होत तिला सगळं स्पष्ट स्पष्ट , पण हे साल मन काहीच बोलत नव्हतं.....
मला बहू अंशी बदलून टाकणारा तो क्षण जवळ आला
एका कार्यक्रमानिमित फुलाच्या वादावरून तो प्रसंग घडला...
आता फक्त तो तिचा गैर समज होता
पण मला पुढे तो प्रश्न विचरायचाच होता....
माझी चूक नसतांना ती माझ्यावर भडकली
पण बर झाल त्यातून तीन मला माझी औकात दाखवली...
तिचे ते शब्द एकूण तिच्या कानाखाली वाजवाव वाटलं
पन पुन्हा म्हटलं जाऊ दे तुझ्या प्रश्नांच उत्तर तुला न विचारताच भेटलं.......
आता मात्र मी माझ मन वळवायच ठरवलं
जिथं नको तिथं त्याला नेलं
पण हे शक्य नव्हतं
कारण ते तिथंच बांधुन होत....
आज मी माझ्या मनाला प्रश्न केला
आठ वर्षे तिचेच विचार करून तुला काय मिळालं ???
ते उतरलं...
तुला जवळ न घेता तीनच तुला दुसर्यापासून दूर ठेवल आणि हे तुलाच माहीत आहे या गोष्टींन तुला किती घडवलं....
आणि महत्त्वा च म्हणजे
तोडंका मोडंका का होईना पण कवी तिनेच तुला
बनवलं.
या भावना कागदावर उतरण्याच कारण
आज वाचलेली खांडेकरांची कादंबरी "पहिलं प्रेम"
त्या कादंबरीन मला सांगितलं की
माझं प्रेम तिला शारीरिक आकर्षण वाटलं....
मग हाच प्रश्न मी माझ्या मनाला केला
खरच का?????
आज मात्र ते उत्तर होत की प्रश्न मला नाही समजलं
ते बोलल....
"शारीरिक आकर्षन" अन ते पण पाचव्याच वर्गात??
- योगेश द. राऊत✍️
📱7499997984

