माझी मराठी
माझी मराठी
शब्दा शब्दात रचुनी मराठी
तुकोबाने लिहिली गाथा
मायबोलीत रचुनि अभंग
मनामनाची मांडली व्यथा
कथा कादंबऱ्या आणि अभंग
माझ्या मराठीच्या संग
भक्तजन करुनी श्रवण
झाली भजनात दंग
माझ्या मराठीचे बोल
समंदरा परी खोल
उंच उंच लाटा उसळीत
दावी आपले ती मोल
संत ,कवि करुनी लिखाण
अज्ञानाची देती जाण
शब्द शब्दांना बांधुनी
देती मराठीला मान
बोल माझ्या मराठीचे..
वळवावी तैसी वळे
कधी मातीमंदि लोळे
कधी आभाळाला मिळे
माझ्या मराठीची थोरवी
साधुसंतांनी गायली
शब्दा शब्दातूनी वाहते
माझी मराठी माऊली
