क्रांतिवीर भगतसिंग
क्रांतिवीर भगतसिंग
1 min
254
इन्कलाब जिंदाबाद...
भगतसिंग करी नारा
नाव ऐकता या विराचे
वाही क्रांतीचा वारा.
ऐसा क्रांतिकारी वीर
होता भगतसिंग सरदार.
सळसळत्या रक्ता मधूनी...
जागे देशभक्तीची लहर.
होता तरुण बांड सरदार
घेतली क्रांतीची हाती मशाल.
ऐसा बंड उभारीला त्याने
भयभीत ब्रिटिशांना केले.
करुनी एकजूट सरदार
करी ब्रिटिशांवरी प्रहार.
घेऊनी संघटनेचा आधार
करी शस्त्र अस्त्र पसार.
ना लागे कुणाच्या हाती
ना कुणाला त्याचा ठाव
ठेवूणी नजर इंग्रजावरी
घाली अचानक घाव...
मनी देशभक्तीची प्रीत
करी देश सेवा सदोनीत
जागुनी क्रांती... मना मनात.
उभारीले क्रांतिवीर या मातीत....
