Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anupama Tirth

Inspirational

3  

Anupama Tirth

Inspirational

माझी मामी

माझी मामी

1 min
846


मामी माझी खूप गुणाची 

आवड तिला स्वयंपाकाची !

पदार्थ बनवी स्वादिष्ट व रुचकर, 

मागाल तो करी , पुढ्यात हजर ! 

दडपे पोहे ,ढोकळा, गुळपोळी, भेळ ! 

तिचा सर्वांशी चांगलाच मेळ !

भरतकाम , विणकामातही निपुण

परिपूर्ण नारीचे की हो हे गुण ! 

मामा मामीचा संसार भलताच गोड ! 

त्याला संस्कार व नियमांची जोड !

प्रशांत आणि प्रसाद खूप भाग्याचे !

अशी आई करी कल्याण जीवनाचे !

माझ्या लग्नात कृपा केली विशेष !

कुठलेच सोपस्कार ठेवले नाही शेष !

मिळवले माझ्या कन्यादानाचे पुण्य

तुम्हां दोघांविना सगळंच होतं शून्य !

मानपान ,केळवण , मेहूण , डोहाळे जेवण,

तु स्नेहात गुंफलास माझा प्रत्येक क्षण !

सौख्य-स्वास्थ्य राहो तुझ्या अंगणी 

तुला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना मनी !


Rate this content
Log in