आई
आई
1 min
197
पहिल्यांदाच तुला सांगते गं मी काही
आई तुझ्या सोशिकतेला तोड नाही !
किती करशील आमचे तू थकत का नाही ?
देव सुद्धा अचंबित होई वरुन जेव्हा तुला पाही !
आमच्यासाठीच तु जन्म तुझा वाहिला
जगत असतो आम्ही तुझंच पुण्य घेऊन पाठीला !
अखंड झिजत राहीलीस आम्हांसाठी निरंतर
काय उत्तर देऊ देवाला जेव्हा आम्ही जाऊ वर ?
तुच आमचे करत राहीलीस ,थांबलीच नाहीस कधी
तुझी सेवा करायची आम्हाला दिलीच नाहीस संधी
प्रत्येक बिकट प्रसंगी खंबीरपणे उभी राहीलीस
आमच्या सुखासाठी मात्र स्वत:ची होळी केलीस !
फक्त देत राहीलीस , मागीतलं कधीच काहीच नाही
तुझे उपकार फिटणार नाहीत ,जन्म पुढे सरत राही !
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !
आईचा आशीर्वाद नसेल तर हे जीवन आहे विकारी !
