माझी मावशी
माझी मावशी
1 min
382
तुझ्यासारखे जीवन जगावे !
प्रत्येक भुमीकेत चमकावे !
केदार आणी भाग्याची आई ,
सदा त्यांच्या पाठी उभी राही !
मुख्याध्यापिका वठवली खास !
मुलांचं कल्याण हा एकच ध्यास !!
ईसब रोगामुळे लागले ग्रहण
पण ते ही केले हसत हसत सहन !
सोळा सोमवारचे व्रत महाकठीण
मावशीस कुठे हो आळस वा क्षीण ?
माधव काकाशी केला सुंदर संसार !
दोघांनी मिळून छान संभाळला भार !
ना कधीच तक्रार , नव्हते दुमत होत!
फक्त प्रेमच भरले होते ओतप्रोत !
माधव लिलु - दो जिस्म एक जान
पण अकस्मात् गळून पडलं पान !
देवाला हेच मागते तुझ्या वाढदिवशी
सदा सुखी राहु दे माझी मावशी !
