STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Classics

4  

Dattatraygir Gosavi

Classics

माझी कविता

माझी कविता

1 min
312


जोडी ओबड धोबड 

मनातील खदखद

गोडी आंतरिक मन 

दिली जशी त्यान दाद ।।धृ।।  


दिसे तेच मी  टिपतो

चाले  निसर्ग गुऱ्हाळ

चाली रीती  रंगवतो

जणु निघते वऱ्हाड ।।१।।


एक एक काडी आणी

माझे बसवी बिऱ्हाड

गाणी गातो मनातून 

खोपा पक्ष्यांचे जुगाड।।२।।


सार जगण्याचा घोर

रोज झटकी मरळ

साय संगी पतंगाची

देवा वाहतो हराळ।।३।।


रोज  उपणतो  सुप

बरे वाईटाचे  खूळ

खरे खोटे देव जानो

रोज जपतो मी मूळ।।४।।


देव साक्षी देव पक्षी

विहरतो आकाशात

नदी पहुडतो आक्षी

जलचर तो साक्षात ।।५।।


लिही मोडक तोडक

ठोका ह्दयाचा सरळ

देवा शप्पथ बापहो

माझी ओकतो बरळ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics