STORYMIRROR

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

🌹माझा प्रिय गुलाब

🌹माझा प्रिय गुलाब

1 min
211

आहे आठवणीत माझ्या आजही तो गुलाब

ज्याने आला होता अनेक भावनांचा सैलाब

झाला होता दोन जीवांचा तो सुंदर मिलाप

होता तो साक्षी त्या दोन मनांचा तो गुलाब..!


   सुंदर पाकळ्यांनी नटलेला असाच होता तो

   काटेरी कवचातुन नुकताच तोडलेला होता तो

   सुवास त्याचा दरवळत तो तुझ्या हातात गेला

   तसाच एक गुलाब तुझ्याकडुन माझ्याकडे आला


जसा त्याचा गंध होता तशी सुंदर होती भावना

जाणले होते आपण ऐकमेकांच्या जाऊनी मना

पाकळ्यावर पडलेल्या पाण्याने तो अधिक फुलला

त्याच्या त्या रुपाला पाहुन प्रेमवीर तो भुलला..!


   आठवण त्या गुलाबाची आता सदैव येत राहते

   भुतकाळातल्या अनेक गोष्टींने हे मन हेलावते

   त्या नकारातही होकार होता हे का बर वाटते

   आज ते आठवल्यावर हे अंतकरण जेंव्हा दाटते..!


दवबिंदुला पाहुन झाले गुलाबाचे मला स्मरण

लिहाव्या वाटल्या या ओळी चढले ते स्फुरण

होते त्या गुलाबात दडलेले बरेच काही कारण

ठरवले होते बांधायचे तेंव्हा प्रेमाचे ते तोरण


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance