STORYMIRROR

Preeti Gogate

Inspirational Others

4  

Preeti Gogate

Inspirational Others

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
346

माझा महाराष्ट्र महान

त्याचे गाऊ गुणगान ।।


रत्नहिऱ्यांनी भरली असे

महाराष्ट्राची खाण 

सात शतकांचा वारसा

हे मायबोलीच वाण ।।


पवित्र येथील माती

जन्मले बाल शिवाजी कैक

स्वराज्याचे बीज पेरले

लढले मावळे कित्येक ।।


शिवबाचे गर्जती पोवाडे

डफाच्या थापेवरती

दर्याखोऱ्यातून लढले मावळे

शिवबाच्या हाकेवरती ।।


विविधतेत एकता जपते

येथील संस्कृती नेक

माया लावते सकलांना

या महाराष्ट्राची लेक ।।


विविधतेत नटला निसर्ग

पर्वत अरण्य घनदाट

भाविकांनी भरले येथील

गंगेचे पवित्र घाट ।।


संत साहित्याने भरली

या महाराष्ट्राची ओटी

स्त्रियांना दिधले शिक्षण

नमन त्या सावित्रीस कोटी कोटी ।।


माझा महाराष्ट्र महान 

त्याचे गाऊ गुणगान ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational