माझा भारत देश
माझा भारत देश
गावुया जन गण मन देशाचे गाण
नेहमीच राहील आपला भारत देश महान
भारतमाता आपुल्या पुत्राला सदैव अर्शीवाद देणार
जाहले जे थोर सेनानी अमर ते होणार
नदया तुझ्या संजीवनी तु स्वच्छ रे ठेविणार
जेव्हा तूला त्यांचे महत्व कळणार
वेगवेगळे प्रयोग करूनी विज्ञानाचे झाड बहरणार
मुले आजची सारी देशाला विजयी करणार
देश आजचा फळा फुलांचा आणिक विकसित होणार
प्रत्येक आपत्तीवर मात करुन तिरंगा आपला फडकवणार
पण होणार हे तेव्हा जेव्हा जाति धर्म श्रीमंत गरीब एकत्र येणार
आनंदाने उत्साहाने प्रगति भारत करणार
होता मग प्रगती देशाची नाव कोणी नाही ठेविणार
चला चला बोलूया भारत देश महान, भारत देश महान
मुक्या प्राण्यावरती करून अन्याय पाप तुलाच रे मिळणार
निसर्गाला ठेवुन स्वच्छ उपयोगी तुझ्याच रे पडणार
शासनाने दिलेल्या सोयींचा योग्य वापर कर तू
जाईल सगळे संपुन जर स्वार्थाच्या सिमा ओलांडशिल तू
वापरूनी स्वताचे डोके घडव नवा भारत तू,
विकसीत करूनी त्याला ने सगळ्यांच्या वर तू
