माझा बाप
माझा बाप
माझा बाप देवतुल्य
आहे संस्काराची खाण,
त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने
होते कर्तव्याची जाण...//१//
बाप घराचा आधार
लेतो संकटाचा भार,
कष्टकरी जीवनात
दिसे जीवनाचं सार...//२//
बाप नावाची ही जादू
असे सर्वांच्याच घरा,
साऱ्या कुटुंबाचा आहे
जणू एकोप्याचा दोरा...//३//
माझा बाप तो करारी
त्याचा केवढा दरारा,
पितृतुल्य मानतो हा
गाव अजूनही सारा...//४//
अशा बापाची थोरवी
आम्ही अहोरात्र गाऊ
बाप माझा बलस्थानी
त्याच्या पायी लीन होऊ...//५//