शिव छत्रपती
शिव छत्रपती
सह्याद्रीच्या कुशीत जन्मला
शहाजी जिजाऊंचा छावा,
या मर्दानी जगी दाखविला
मराठ्यांचा गनिम कावा...//१//
हर हर महादेव देऊनि आरोळी
ध्यास हिंदवी स्वराज्याचा,
एक एक मावळा करोनि गोळा
बदला घेतला शत्रूंचा...//२//
निजामशाही, आदिलशाही
शत्रू मोघलांवर केले हल्ले,
स्वराज्याचे रक्षण करण्या
मिळविले गड किल्ले...//३//
'हे राज्य व्हावे' ही श्रींची ईच्छा
सिद्ध जाहला रणा,
जावळी खोऱ्यात प्रतापगडी
कोथळा काढिला अफजलखाना...//४//
कित्येक लढाया जिकूंनी
नष्ट केली अराजकता,
प्रजाहितदक्ष राजा आमचा
मुक्त केली सारी जनता...//५//
विश्ववंदनिय एकच राजा
नाव तयांचे शिवछत्रपती,
चंद्र,सूर्य जोवरी भूवरी
शिवराया दैवता वंदती...//६//
