STORYMIRROR

sanjay holkar

Others

3  

sanjay holkar

Others

कोरोनातील शाळा

कोरोनातील शाळा

1 min
263

 वाट पाहतो बाळांनो ,शाळा सुरू होण्याची...

 या रे या ,सारे या, हाक द्या मायेची...

 काळ लोटला,प्रकोप झाला,साथ थंडीतापाची...

  विश्व संकट उभे ठाकले,दशा झाली जीवनाची!!१!!


 घंटा नाही,नाद नाही,नाही किलबिल लेकरांची...

 नाही अभ्यास,नाही खेळ,व्यथा बंद शाळेची...

 आली महामारी जगतावर,पहिली सुरक्षा तुमची...

  समूहात जाणे टाळून,काळजी घ्या रे स्वतःची!!२!!

    

 नका घाबरू बाळांनो, सवय सॅनिटायझर मास्कची...

 पाळून अंतर सामाजिक, गरज आहे व्यायामाची...

 नियम पाळून, घरात राहून, काळजी घ्यावी कुटुंबाची...

 आली कित्येक संकटे, गरज आहे धैर्याची!!३!!


 झाल्या बंद शाळा, उणीव जरी सहवासाची...

 शाळा बंद,शिक्षण सुरु, संधी ऑनलाईन अभ्यासाची...

आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल, संगणक वापराची... 

 कोरोनाला हरवून, कास धरा तंत्रज्ञानाची...!!४!!


Rate this content
Log in