माझी बहीण
माझी बहीण
1 min
328
माझी बहीण बहीण
आहे मायेचाच झरा...
राखीपुनवेच्या सणा
आली अपुल्या माहेरा...
माझी आक्का माझा प्राण
जणू रत्नांचीही खाण...
कोरोनाला हटवून
करे ती रक्षाबंधन...
माझी बहीण बहीण
माझी आई ती दुसरी...
आपल्याच हाताने ती
मायेचाच घास भरी...
आक्का माझी ती आधार
साऱ्या दुःखाचा विसर...
आली कितीही संकटे
उभी धैर्याने समोर...
आक्का असे दूरगावी
नाही वाटत दुरावा...
हळुवार शब्द देती
जणू मायेचा ओलावा...
माझी बहीण बहीण
असे एक ती लाखात...
साऱ्या कुटुंबासोबत
राहो सदा आनंदात...
