माेजकेच बाेलू...
माेजकेच बाेलू...
माेजकेच बाेलू आवरा फापटपसारा,
नेमक्या शब्दांच्या काेसळू द्या धारा...
माेजकेच बाेलू साधू ह्दयस्थ संवाद,
माेजके बाेलणे घालते मनामनाला साद...
माेजकेच बाेलू हेच जीवनाचे सार,
शब्दांना हवी जरा आपुलकीची धार...
माेजकेच बाेलू का करावी व्यर्थ बडबड,
माेजकेच बाेलून फुलवू हा जीवनाचा वड...
