लिहिण्यासाठी शब्द वेचताना...
लिहिण्यासाठी शब्द वेचताना...
काही दीर्घ तर काही ऱ्हस्व सापडले
काही नकार तर कधी होकार सापडले
काही अपूर्ण तर कधी पूर्ण सापडले
काही अर्थपूर्ण तर काही निरर्थक सापडले
काही गुंतागुंतीचे तर काही अगदी मोकळे सापडले
काही घाबरवणारे तर कधी धीर देणारे सापडले
कधी प्रेमळ तर कधी द्वेष करणारे सापडले
काही एकटे तर काही एकत्र सापडले
काही आपले तर काही परके सापडले
काही डोळस तर काही आंधळे सापडले
काही जवळीक साधणारे तर कधी दूर लोटणारे सापडले
काही ओले तर काही कोरडे सापडले
काही सावली देणारे तर काही चटका देणारे सापडले
काही पोकळ तर काही भरलेले सापडले
काही अंधारकडे नेणारे तर काही उजेडात नेणारे सापडले
