लग्न धरेचं अंबराशी…
लग्न धरेचं अंबराशी…
ऊन पावसाचा खेळ रंगतो श्रावणामधी
धरा हिरवा साज लेयते श्रावणामधी
सप्तरंगी इंद्रधनु फुलवून
शृंगारतो नभही श्रावणामधी
ढोल ताशांचा गजर अन् प्रकाशाचा …
लखलखाट करतो वरूणराजा
धरा-अंबराच्या लग्नात श्रावणामधी
सुख-दुखं झेलतं
नभ-धरेचं आयुष्य बेधुंद बहरतं
ऊन पावसात ह्याच श्रावणामधी
ऊन पावसाचा खेळ रंगतो
ह्याच त्या श्रावणामधी….

