लेक
लेक
लक्ष्मी लेकीच्या रूपानं
आज आलीया घरात
झाल्या संवेदना जाग्या
मेल्या वेदना उरात!!
बाप झालो मी लेकीचा
सुख मावेना हृदयात
स्वर्ग म्हणतात ज्याला
नांदू लागला दारात!!
गोड परी तू गं माझी
माझ्या श्वासातला श्वास
माझं काळीज गं तूच
तूच खंबीर विश्वास!!
बाप लेकीच्या प्रेमाचं
नाही कसलंच माप
लेक घेईल जाणून
आत होणारा आलाप!!
सुख आनंदाने आलं
आलं चालून जोरात
लक्ष्मी लेकीच्या रूपानं
आज आलीया घरात!!
