STORYMIRROR

Veer Desai

Fantasy

2  

Veer Desai

Fantasy

नातं

नातं

1 min
73

तुला पाहिलं तवाच

तू भरली मनात

तुझ्यामुळे गं जुळलं

माझं लेखणीशी नातं!!


सखे मांडत राहिलो

मी मनातलं सारं

तू होतीस म्हणून

आली लेखणीला धार!!


किती आठवावे तुला

रोज झुरुन झुरुन

प्रेम तुझे या वेड्याला

दे गं आभाळभरून!!


राधा तू गं सावळ्याची

जरा असु दे तू भानं 

तुझ्याविना काळजाच

दिसें ओसाड हे रानं!!


तुझ्या प्रेमाच्या सरीत

वाटे चिंब मी भिजावं

दुःख विसरून सारं 

तुझ्या मिठीत निजावं!!


सखे झालीस गं ढाल

तू तळपती तलवार

तू आहेस म्हणून

आहे लेखणीला धार!!

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy