एक कविता माझी
एक कविता माझी
सखये तू वाच
एक कविता माझी
मी त्यात मांडलेली
जुनी आठवण तुझी !!
पडक्याचं भिंतीवर
प्रतिमा अजून टांगलेली
काळजाच्या तळाला
तूच केवळ पांगलेली !!
तुझ्या येण्या जाण्याचा
तोच रस्ता जुना
ठेवून गेलीस त्यावर
तू तुझ्या पाऊलखुणा !!
तुझ्या त्या पाऊलखुणा
मनी माझ्या उमटल्या
या हळव्या काळजात
भावना मात्र दाटल्या !!
पसारा तुझ्या आठवांचा
उरात घेऊन फिरतो
तुझ्या प्रेमाचा भुंगा
भोवती अजून भिरभीरतो !!
उनाड वारा अंगाला
असा काही झोंबतो
दूर नाही गेलीस तू
एवढेच मला सांगतो !!
काळजाला काळजावर
मारू दे एक बाजी
ये आता परतूनी
कर मनाला राजी !!
सखये तू वाच
एक कविता माझी...
