लावणी
लावणी
नटून थटून मी तयार होता,
कशाला तुम्ही एकटक बघता
पाटील खिडकीत बसून,गालात हसून नुसतंच खुणवता llधृll
वय नुकतच सरल सोळा
करुनी तुम्ही तिरका डोळा
बाहुंचा हार घालते मी गळा
जीव झुरं हा तोळा..तोळा
नका करु खोडी दुरून, याव जवळच तुम्ही हो आता
पाटील खिडकीत बसून,गालात हसून नुसतंच खुणावता ll१ll
थरथरं हे ओठ,अंग माझं शहारी
चोळी होई तंग जीव हा घाबरी
रंगुन जाऊ या पीरतीच्या खेळांत
मला जागा द्याहो तुमच्या हृदयात
माझ्या जीवाची करुन उलघाल,काहोअसं तुम्ही छळता
पाटील खिडकीत बसून,गालात हसून नुसतंच खुणवता ll२ll
मज रुप मनामध्ये अस भरा
मजला राणी तुमची हो करां
देते तुम्हां या दिलात मी थारा
अंगी भरलाय हो ईष्काचा वारा
नयनांची भाषा बोलून ,का हो तुम्ही दुरुनच असं डुलता
पाटिल खिडकीत बसून,गालात हसून नुसतंच खुणवता ll३ll

