STORYMIRROR

Sumedha Adavade

Abstract Fantasy

2  

Sumedha Adavade

Abstract Fantasy

कविता

कविता

1 min
419

ऐकताना कानांसोबत मनही द्यावं लागतं

कविता कळायला कविता व्हावं लागतं


खूप छान चित्र असतं रेखाटलेलं

हिरवेगार डोंगर, झाडे, निळ्या आकाशात

स्वैर उडणारे पक्षी, निळ्या नदीचे पाणी

त्या पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर पडून,

भानावर येईपर्यंत चित्रात उतरावं लागतं....

कविता कळायला कविता व्हावं लागतं....


समुद्रात एक गोंडस होडी चालत असते,

हलत, डुलत, लाटांच्या इच्छेनुसार

वादळ आलं तरी ते तिला त्याला हवं तसंच वागवतं

होडीची मनिषा काय आहे हे समजायला,

पाण्यातली होडीच असावं लागतं...

कविता कळायला कविता व्हावं लागतं...


तू कितीही कर बहाणे आता न भेटण्याचे,

पंख असुनही उगाच बळ वाढव सरपटण्याचे,

तुलाही ठाऊक आहे आणि मलाही आहे माहीत,

तुझे नि माझे नाते आहे मौनानेच नटण्याचे

ते नाते उमजायला, तू, मी किंवा मौन बनावं लागतं

कविता कळायला कविता व्हावं लागतं...


किती शब्द, किती कल्पना, किती भावना, किती आशय...

नानाविध रंगांनी भरलेला किती विशाल जलाशय!

त्या जलाशयाभोवती, चरणारे पांढुरके मऊ ससे

आणि पिसारा फुलवून मनसोक्त नाचणारे मोर...

त्या पिसाऱ्यातलं मोरपीस एकदातरी मनावर फिरावं लागतं

कविता कळायला कविता व्हावं लागतं...


Rate this content
Log in

More marathi poem from Sumedha Adavade

Similar marathi poem from Abstract