STORYMIRROR

काव्य चकोर

Romance

3  

काव्य चकोर

Romance

कविता माझी

कविता माझी

1 min
301

ती म्हणाली,

काय कवी.!

आज कविता नाही..??

हरवली का तुमची कवितांची वही..?

का संपली?

तुमच्या लेखणीतील शाई

हेच कारण का आणखी काही..??


मी हसलो अन् म्हणालो,

तसा प्रश्न तुझा गं गौण आहे

शब्द जरा मौन आहे

पण बोलते हृदयाची धडधड

आतुरलेला प्रत्येक क्षण आहे..!!


घेऊन बघ जरा मनाचा ठाव

कागद तुझ्या समोर आहे

वाचून बघ ना डोळ्यात माझ्या

मग समजेल तुला

कविता माझी कोण आहे..??


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance