Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Tragedy Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy Inspirational

कुंकू

कुंकू

1 min
210


लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी

साहेबांचा फोन आला

सिमेवर चकमक सुरू झाली

आणि मी तसाच निघालो

जाताना मागेवळून बघण्याची हिम्मत झाली नाही


ती तशीच धावत आली

पाठीमागून मिठी मारली

परत कधी येणार 

म्हणून विचारू लागली

सांगता आल नाही

पण तिच्या पदराला परत 

येण्याची गाठ बांधून

कुंकू सांभाळून ठेव म्हणून सांगले

परत आलो तर निश्चितच तुझ्या कपाळी लावीन


आता कुठे मुलगा मोठा झाला

बापाशी बोलायला लगला

अशातच साहेबांचा फोन आला

सिमेवर चकमक सुरू झाली

आणि मी तसाच निघालो

काही न बोलता 

पण मागे वळून पाहू शकत नव्हतो लेकराला


पोरगा तसच धावत आला

पायाला बिलगला

आणि म्हणाला

बाबा तुम्ही जावू नका

म्हणजे आईला कुंकूशिवाय आरशात बघाव लागणार नाही

कारण तुम्ही गेल्यावर

आई स्वतःच्या जिवापेक्षा

कुंकू जपून ठेवते

दारात उभी राहून

तुम्ही परत येण्याची वाट बघते


अश्रु डोळ्यातून बाहेर येवू न देता

मुलाला समजावून सांगितले

तुला जशी आईची गरज आहे

तशीच भारत मातेला माझी गरज आहे

परत आलो तर

विजयी होवूनच येणार

भारत मातेच्या कपाळावरचा कुंकू

तुझ्या आईच्या कपाळी लावणार

त्या नंतर घरात आरसा कधीच नाही दिसणार

पण मी परत येईपर्यंत 

आरसा राहू दे 

आणि आईला कुंकू सांभाळायला सांग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy