STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

4  

Mangesh Medhi

Inspirational

क्षण

क्षण

1 min
437

हर एक क्षण जर नवा इथे

जन्म नवा हर एक क्षणी


मग कशास हवी मोजदात

अन कशास मांडावा हिशेब


कशास सल विरत्या क्षणांचे

अन हळवे बंध गत-क्षणांचे


कशास मोह येत्या क्षणांचा

क्षणा क्षणातल्या मृगजळाचा


कशास उपसु मी रहाट जुने

अन का भिजवू गाडगी जुनी


क्षण एक जरी जगलो कलंदर

क्षण आणिक हवेत कशास.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational