STORYMIRROR

Akshay Rupnawar

Inspirational

3  

Akshay Rupnawar

Inspirational

क्षण असंख्य अनेक

क्षण असंख्य अनेक

1 min
27.9K


क्षण असंख्य अनेक युगांसवे लांबले

बोलण्यासारखे खूप काही पण शब्द ओठांवरच थांबले


भिरभिरत्या त्या डोळ्यांना नजर काही भिडेना

प्रश्नाला त्या माझ्या उत्तर काही मिळेना


लाली आल्या गालावर केसाची बट काही ठरेना

केसांमधल्या बोटांना संगत काही मिळेना


भिजल्या त्या मातीच सुगंध असा काही दरवळला

काळोख्या त्या थंडीत जणू पारीजातक सुखावून गेला


हात मधल्या हाताला कंप असे काही सुटले

खांद्यावर टेकल्या तिच्या डोक्यानेच उत्तर मला मिळाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational