कर्तृत्व
कर्तृत्व
तुझ्या कर्तृत्वाची जराही कुणास जाण नाही
दिखाव्याच्या जगात तोंडपूजेपणास वाण नाही
झिजता जरी करुनि कष्ट रात्रंदिन उरापोटी
का घातलीस त्यांच्या उरी जाणीव वांझोटी
करिती मौजमजा बिनदिक्कत तुझ्याच जिवावरी
म्हणे प्रेम करतो आम्ही काळजाच्या तुकड्यावरी
कामा पूरता मामा, अशी त्यांची रीत, डोळ्यात पाणी
कर जवळ तुही तटस्थता, तोडुनी पाश मायेचे