STORYMIRROR

Ulka Mankar

Classics

3  

Ulka Mankar

Classics

शब्द

शब्द

1 min
12

शब्दांना साहित्यात स्थान आहे

लिहिणाऱ्यांना त्याचे भान आहे


तरीही साहित्याचे माजत रान आहे

लिहिणाऱ्यास वाटते मी महान आहे


सुदैवाने शब्दांचे मजसी ज्ञान आहे

स्वतःस ज्ञानी म्हणण्यास सान आहे


कल्पनाविलासाचे मज वरदान आहे

सृजनशीलतेचे मिळालेले दान आहे


सुसाहित्य निर्मितीस जगती मान आहे

असा निर्मिक सदैव दैदिप्यमान आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics