STORYMIRROR

Ulka Mankar

Inspirational

3  

Ulka Mankar

Inspirational

अस्तित्व

अस्तित्व

1 min
10

शाळा सुटली पाटी फुटली

तेंव्हा म्हणणं होतं अगदी खरं

घरी परतल्यावर फेकून दप्तर

उंदडायचो जसं अंगात भरलं वारं


पाटपाणी, चित्रावती अन उनऊन जेवण

उरलं फक्त स्वप्नात, आता नुस्तं पोटभरण

अभ्यासटभ्यासा नंतर मनमुराद उंडारणं

सांजेच्या परवाच्याआधी चमचमीत खाणं


आट्यापाट्या, लगोरची, फिरवणं चकारी

भाड्याच्या सायकलीवरची मुक्त भरारी

गुडूप झाल्या भरभराटीच्या रंक बाजारी

नुसतीच रुखरुख वास्तवात शोधणे परी


आता हरवले खेळ, हरवलं त्यांचं अस्तित्व

आठवणींचा मेळ उरलं त्यावरचं कवित्व

अपूर्ण वाटे साऱ्यावीण आयुष्याचे पूर्णत्व

माझ्या आयुष्यावर ना उरे माझे स्वामित्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational