STORYMIRROR

Sudhakar Gawade

Classics

4  

Sudhakar Gawade

Classics

आठवणी.

आठवणी.

1 min
475

आठवणी


ढग जमता आभाळी

आठवांना येई पूर

आत बाहेर भिजवी

बाई पाऊस खट्याळ


गेले उडून शैशव

दूर राहीले माहेर

अंगणात थेंब थेंब

जीवा करीती विभोर


दिसे गावचे देऊळ

भिजलेली शेतीवाडी

डबक्यात सोडलेली

साद घाली निळी होडी


काचेवर खिडकीच्या

हळू ओघळती धार

चित्त करी सैरभैर

दिसे कॉलेजचा पार


झिम्म जोरदार सर..

त्याचा भिजलेला खांदा

गंध त्याच्या अत्तराचा

घालू लागे मनी पिंगा


धुंद चंदेरी पाऊस

आडदांड धुसमुळा

अंग अंग रोमांचित

स्पर्श रेंगाळे आगळा


आणि पाऊस कहर

डुबलेले घरदार

माझ्या शहराने मुकाट

सोसलेला हाहाकार


भल्या बुर्‍या आठवणी

येती दाटून अशाच

प्रतिवर्षी जेव्हा होतं 

आगमन पावसाचं, आगमन पावसाचं....



ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

More marathi poem from Sudhakar Gawade

आठवणी.

आठवणी.

1 min ପଢ଼ନ୍ତୁ

Similar marathi poem from Classics