कोरोना गझल...
कोरोना गझल...
प्रिये तुझा मला लळा आहे
पण वर्तमान जरा वेगळा आहे
पसंत केलेस मला मी मुंबई पुण्याचा
मनाने निर्मळ थोडा रंगाने काळा आहे
नुकतेच अडकलो बेडीत दोघे आपण
प्रेमकारंजे मनात पण कोरडा गळा आहे
तू हंसिनी विरहात व्याकुळलेली
मी राजहंस तुझा भोळा आहे
मिलनाची आस तुला मला सारखीच
विरह सोसू थोडा कारण आपल्यावर
कोरोनाचा डोळा आहे...

