किती सुंदर रात आहे
किती सुंदर रात आहे
बघ आज किती सुंदर रात आहे,
धडधड तुझ्या अनं माझ्याही उरात आहे..
नको विलंब निसटुन क्षण जात आहे,
स्पर्शुदे तुझा जो थरथरता हात आहे...
अलगद मिठीत विसावू चंद्र अंबरात आहे,
कशाला उगा दिवा कजव्यांची साथ आहे...
विसर आता एकांत त्यावरही मात आहे,
भिडूदे नजर का लाजुन जात आहे...
विरघळू दोघे जणू सर्वस्व यात आहे,
मनं शृंगारीक गाणे हलकेच गात आहे...
एकजीव होण्याची ही अशी चांदरात आहे,
किती सुंदर भाव बघ आपल्या प्रेमात आहे...
आपल्या प्रेमात आहे...