STORYMIRROR

Sandeep Waje

Others

2  

Sandeep Waje

Others

पाउस

पाउस

1 min
13.6K


 

पाउस बरसू लागल्यावर

थेंब हातावर झेलतो,

मनातलं सारं काही

मग पावसाशी बोलतो.

पाउस बरसू लागल्यावर

तुझा हात आठवतो हाती,

देहाला शहारा आणतात

त्या ओल्या ओल्या राती.

पाउस बरसू लागल्यावर

आठवते तुझी मिठी घट्ट,

भिजायचचं आज असा

तुझा असायचा हट्ट.

पाउस बरसू लागल्यावर

एक आठवण अशीही येते,

तुझ्या उबदार स्पर्शाची

सुखद जाणीव देते.

पाउस बरसू लागल्यावर

आता हळूच आठवण रडते,

पागोळ्यांचे वाहते पाणी

माझ्या तोंडावर उडते.

पाउस बरसू लागल्यावर

करतो मी मग सरशी,

आपसुकच वाट धरतो

प्रिये तुझ्या घरची.

पाउस बरसू लागल्यावर

चालता चालता काही आठवतं

तू नाहीस जगात आता

माझ काळीज गोठवतं.

पाउस बरसू लागल्यावर

आठवणी पळतात माझ्यापाठी,

आभाळं होउन पापण्यां

जणू झरतात तुझ्यासाठी.

पाउस बरसू लागल्यावर

अशी होते माझी गत,

भिजवूनी घर सारे

कोरडेच राहते छत.

कोरडेच रहते छत.

 

 


Rate this content
Log in