STORYMIRROR

Sandeep Waje

Others

2  

Sandeep Waje

Others

डोळे

डोळे

1 min
14.2K


भाव तुझ्या मनातले

सांगतात डोळे,

अलगद माझ्या नजरेत

नजर पांगतात डोळे.

हसतात डोळे कधी

रडतात डोळे,

एक तिक्ष्ण कटाक्ष देवून

लढतात डोळे.

बघ छबी तुझी माझ्यात

बोलतात डोळे,

तुज शृंगारास दर्पण

खोलतात डोळे.

सीमा नसते मान्य

ती लांघतात डोळे,

बंध तोडून सारे

रांगतात डोळे.

मी खट्टयाळ वागता

तुझे लाजतात डोळे,

कधी मादकता नजरेने

मज पाजतात डोळे.

खटकलेच काही तर

टाळतात डोळे,

आवडले जर नक्कीच

भाळतात डोळे.

कधी असे कधी तसे

वागतात डोळे,

एक सुंदर काव्य नजरेस

मागतात डोळे.

 

 


Rate this content
Log in