Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

किमया..!

किमया..!

1 min
179


डोह माझ्या सारखाच वाटला मला

शांत शांत निशब्द झाल्या सारखा

आत डोकावून पहात असावा जणू

आपलाच अंगरखा पुन्हा पुन्हा....

माझ्या सारखे असेल का कोणी.?

की असतील किती तरी..?

उगाचच म्हणतात धीर देण्या

बेटा डोन्ट वरी डोन्ट वरी...!

इथे कालवा कालव होते म्हणून

आलो या डोहा शेजारी

तो ही म्हणतो मूक पणे

शांत राहू दे मला,जा माघारी..!

राग आला शांतता भंग झाल्याने

लहरी उठल्या पाण्यामध्ये खडा फेकल्याने

म्हणला बरे झाले, मला हसवलेस 

जाता जाता नाही फसवलेस..!

स्तिमित होऊन वलये पहिली

ऊर्जा विस्तारून द्विगुणित झाली

माझी मला जाण आली

किमया वेगळीच डोहाने केली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics