STORYMIRROR

Priti Dabade

Romance Inspirational

3  

Priti Dabade

Romance Inspirational

खिडकी

खिडकी

1 min
558

खिडकीत मन आज

का रेंगाळते आहे

पुन्हा पुन्हा वळून

पाहते आहे


मंद वाऱ्याची झुळूक

अन् त्याचा मोहक गंध

खुणावतो जणू 

तोडुनी सारे बंध


उगीचच त्या खिडकीच्या

गजांशी खेळणं

तुझ्या आठवणीत

हरवून जाणं


चंद्र, ताऱ्यांची मैफिल

रात्रीच्या काळोखात पाहणं

तुला आणि मला

त्यात कुठेतरी शोधणं


मनातील कोपरा

जणू ती खिडकी

मधेच घेई

उगाच फिरकी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance