STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

खेळते एकटी नशिबाशी

खेळते एकटी नशिबाशी

1 min
256

अजुनी तितकीशी जुळली नाही 

मैत्री थकल्या त्या पापण्यांशी 

धुंद कल्पनेत अशी गुंगते काही 

स्वैर हवा ती मोकळ्या नभाशी 


मनी भावुनी गेला वारा गंधित 

जुनी अठवणी घेते जरा उराशी 

थकल्या क्षणालाही जड वाटत

तेच श्वास विसावती जणू प्राणाशी 


जरा जरा जास्तच दिस कंटाळतो 

बर्बर वाटते कासावीस रोजनिशी 

भराभरा गेले ते दिवस आठवीत 

जग थांबते खेळत एकटे नशिबाशी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance