खडतर प्रवास
खडतर प्रवास
अरे चल उठ वेड्या,
लाग पुन्हा कामाला .
यश येणार नक्कीच ,
आता तुझ्या घामाला .
एका अपयशाने तू आता ,
खचून जाऊ नकोस .
टोचतील काटे होतील वेदना ,
तरी हि तु मागे राहु नकोस .
घेतला वसा टाकू नकोस ,
वचन घेतले मोडू नकोस .
पुढचे पाऊल पुढेच टाक ,
मागे वळून पाहू नकोस .
क्षणिक सुखासाठी विचलित ,
तू होऊ नकोस .
कितीही दुःख झाले तरी ,
ध्येय आपले सोडू नकोस.
