नियती
नियती
1 min
166
लेखीले जे नशिबी तुझिया, ते ते जिवनी पाहशील तू काय सोबती आणलेस अण, काय सोबती नेशील तू .
माता भगिनी पोर बाळं, नाती भरपूर जोडशील तू . घटका भरता दाढेत मृत्यूच्या, एकटाच पडशील तू .
मी पनाचा आव आणून, माझं माझं म्हणशील तू . माझं माझं म्हणुनी सारं, सगळं सोडून जाशील तू .
होत काय अन काय झालं विचार आता करशील तू. जरी असला बलवान तरी नियती समोर हरशील तू.
