STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

3  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

कायमचा तो सुखी

कायमचा तो सुखी

1 min
140

प्रत्येक गोष्टीत वाटणी तुझी, चांगलं वाईट काहीही असो मुखी

लाभली तुझी साथ आता, झालो कायमचा तो सुखी


हसतो रडतो सारं काई, होतो कधी दुःखी

त्यातही वाटा मागितला तू, हसतमुख हे सखी

तयार होती गळ्या लागण्या, शेकडो काय ती नखी

लाभली तुझी साथ आता, झालो कायमचा तो सुखी


जय झाला तेव्हा जल्लोश, पण पराभव जेंव्हा चाखी

तूझ्या सोबती मार्ग शोधतो, रेखूण नवी रेखी

आखतो आहे मार्ग यशाचा, याच डोळ्या देखी

लाभली तुझी साथ आता, झालो कायमचा तो सुखी


स्वभाव माझा खडतर, हिशोब काय तो चोखी

सरत्या आयुष्याला खर्च, सत्याचीच रोखी

रुसवा तूझा आनंद देतो, थकवा बदलतो राखी

लाभली तुझी साथ आता, झालो कायमचा तो सुखी


देशासाठी सदैव तत्पर, जशी ती काय खाखी

तसा मी तूझ्या समोर, तूझ्या साठी वाखी

वाटेल केव्हा केव्हा चेष्टेने, आली आता नाखी

लाभली तुझी साथ आता, झालो कायमचा तो सुखी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance