Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

chinmay phadke

Fantasy

0  

chinmay phadke

Fantasy

जुने दिवस

जुने दिवस

2 mins
1.6K


जुने दिवस एक छानसे घर असावे गावाकडच्या भागाकडे,

सायंकाळी ओसरीत बसून मी पण पाहावे माडाकडे I

एक असावी छोटी बाग, घराच्या पुढल्या अंगणामध्ये,

जाई-जुई, शेवंतीचा गंध दरवळावा मनामधे II १ II


पुढल्या अंगणात तुळशीचे वृंदावन, शोभा वाढावे घराची,

मागच्या अंगणात विहिरीने, तहान पोसावी सर्वांची I

माडीवरून करकरत हलवा, हिंडोळा तो सागाचा,

नभी निशेला लुकलुकणारा प्रकाश असावा चंद्राचा II २ II


त्या घराच्या स्वयंपाकघरातून सुवास यावा सुग्रासतेचा,

घरच्या सर्वांनी गोल बसून फडशा पाडावा त्या सगळ्याचा I

दिवाणखान्यात मोठ्यांचा फड सजवा गप्पांचा,

अंगणामधल्या बागेमध्ये दरबार भरावा छोट्यांचा II ३ II

बाया बायकांची लगबग असावी जणू दिवस सणाचा,

आल्या-गेल्या सर्वांनाच आग्रह असावा जेवणाचा I

सख्खे, चुलत, आत्ते, मावस, भेदभाव नसावा नात्यांचा,

एकजीव होऊन एकत्र रहावे जसा काला कृष्णाचा II ४ II

रात्री झोपण्याआधी, पुन्हा वाटे गोष्ट आजीने सांगावी,

पुन्हा एकदा लहान होऊन आजोबांच्या कडेवर स्वारी निघावी I

मस्ती करून, भीतीने बाबांच्या घरात लपून बसावे

बाबांनी हात उगारताच मात्र आईने मधे पडावे II ५ II


आता मात्र घरामध्ये पाहुणे तसे कमीच येतात,

वेळच नसतो असे सांगून सगळेच येणे टाळतात I

जग बदलले असे म्हणून माणूसच खरा बदलला,

कारण सूर्य तरी अजून पूर्वेऐवजी पश्चिमेला नाही उगवला II ६ II


आपल्याघरी नाही आले जरी कुणी, आपण तरी कुठे जातो?

सगळ्यांनाच आसक्ती स्वतःची , कोण कुणास विचारतो?

सगळ्यांनाच जमेल असा मग बेत एकदा आखावा

एकत्रपणे सर्वानी मिळून आनंद एकदा लुटावा II ७ II


तंत्रज्ञानाने जवळ आणलं म्हणून लोक हल्ली तिथेच बोलतात

एखाद्याचे लिहिणे खटकले तर सरळ भांडत सुटतात l

तंत्रज्ञानाने खरं सांगा तुम्हाला आणलाय का हो जवळ?

लांब असून जवळ आहात हे भासवण्याचं ते मृगजळ ll ८ ll

सोडा रे सगळे व्याप ते, भेटू पुन्हा एकदा कडकडून

लहानपणीच्या आठवणीत सगळे पुन्हा एकदा रमून l

उरलेच आहोत कितीसे आपण, वडीलधारे ते निघून गेले,

आपलीच तर आहे जबाबदारी नाते टिकवण्याची ती भले ll ९ ll


पुन्हा एकदा सर्वांनी, त्या घरात एकदा जमायचे,

आपण जपले ते आता पुढच्या पिढीला दाखवायचे l

होतील ते पण खूप खुष, वाटेल त्यांना हा खजिना,

नाती जपण्यातच आनंद खरा हे पटेल पुन्हा सर्वांना ll १० ll


Rate this content
Log in

More marathi poem from chinmay phadke

Similar marathi poem from Fantasy