जन्म मुलीचा
जन्म मुलीचा
जन्म मुलीचा आईला असतो प्यारा,
पण त्याच आईच्या सासूला का वाटतो न्यारा
घरासाठी सून पाहिजे मुलासाठी पत्नी
तरी गर्भातल्या मुलीसाठीच का घेता दुश्मनी
असतो जिव्हाळा मैत्रिणीचा सुख पत्नीचे,
असावी बहिणीची छाया तरी दुःख मुलीचे
श्रावणबाळ नसतात सगळे उरतो रस्ता वृद्धाश्रमाचा,
वेगळाच असतो आनंद मुलगी जन्माचा
म्हणून सांगतो सुधीर, तुम्ही जरा विचार करा,
मुलाच्या हट्टापेक्षा मुलीचा जन्म बरा
