जिवलगा
जिवलगा
दिवस-रात्र तुझे नाव घेता
कोणीही मनात न उरे आता
तुजसवे मधूर जीवन गीत गाता गाता
आयुष्याची व्हावी अशीच सांगता !!
तुजसवे मी मला नव्यानेच उमगली
चंद्रासम शितल असे तुझी सावली
संसार वेली गोड फुले फुलली
आनंदाने वर्षामागून वर्ष सरली !!
अनंत येती अडचणी अन् खाचखळगे
यशस्वी मात करूनी जाते तुज संगे
भरला तरी कधी तू रागे
तुजभोवती तुज माझे सोयरेसगे !!
हात हातात घट्ट धरूनी
करूनी एकच संकल्प मनी
वाट चालू ,रुजवू नव्या आठवणी
तू माझा ,मी तुझी जीवनसंगिनी....

