जीवन हे...
जीवन हे...
जीवन हे असेच असते
मृगजळासम ते भासते
हाती धरावे परी गवसत नसते
केले प्रयत्न तरी पूर्णत्व येत नसते ||1||जीवन हे...
जीवनाच्या वाटेवर चालताना
क्षितिज कवेत घ्यावे वाटते
पुढे जावे तसे ते मात्र
मागे- मागे हटत राहते ||2||जीवन हे...
ना कुणासाठी थांबते
ना कुणासाठी पुढे येते
काळाप्रमाणे राहणे पसंत करते
जीवनाचे चक्र असे गोल - गोल फिरते ||3||जीवन हे...
कष्ट करण्याची फळ देते
थांबल्या जीवासी स्तब्ध राहते
जणू तेही सावली सारखेच असते
चालता चालते, थांबता थांबते||4||जीवन हे...
जीवन हे असेच असते
एकल्या जीवाचा ते डाव असते
सुख-दुःखाचे जणू गाव असते
रोज तिथे जगणं आणि मरणं असते ||5||जीवन हे...