STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

4  

Ajay Chavhan

Romance

जीव तुझ्यात रंगला...

जीव तुझ्यात रंगला...

1 min
560

जीव तुझ्यात रंगला

प्रेम पाशात फसला।

सोडुनिया शरीराला

तुझ्या अंतरी बसला।।


भूल पडली देहाची

नाही फिकीर कोणाची।

प्रेम तुझे हवे मला

नाही लालसा धनाची।।


शुद्ध अंतःकरणाने

मला येऊनी भेटावे।

प्रेम अर्पूनिया सखे

तृप्त मजशी करावे।।


सुमधूर वाणी तुझी

श्रवूनिया मुग्ध व्हावे।

हातामध्ये हात माझ्या

नित्य तुझेच राहावे।।


हेची करू विनवणी

साथ कधी सोडू नको।

आहे गरीब म्हणून

हृदयाला तोडू नको।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance