STORYMIRROR

Kiran Khiste

Inspirational Thriller Others

3  

Kiran Khiste

Inspirational Thriller Others

झुंज

झुंज

1 min
300

जाणीव मलाही होती, मी चुकलो आहे कोठे...

पण चुकता चुकता अजूनही मी शिकलो आहे कोठे.....


ते टाळ्या वाजवणारा केवळ पुतळा मागत होते...

पण भ्रष्टाचारी बाजारी मी विकलो आहे कोठे.....


होय कालच्या रात्री मी एकांती रडलो होतो....

पण लढता लढता अजुनही मी थकलो आहे कोठे...


हे प्रहार करता करता त्यांनीच टाकल्या माना....

पण झेलत सारे अजूनही मी झुकलो आहे कोठे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Kiran Khiste

Similar marathi poem from Inspirational