जात
जात
ईश्वरा वागले जरी कोणी कसे ही
नाव ठेवणारे नाव ठेवणार आहे असे ही
आई जन्म दिला मला कोणत्या जातीचा
इथे अनेक जातीचे पळतात ससे ही
देव पाहिला नाही मी इथे कधीच
पाहिले तर दगडाला फुटतात पिसे ही
दुष्काळ पडतो जेव्हा काळजावर माझ्या
तेव्हा प्रेमात पाडणारी इंगळी का डसे ही
प्रेम करतांना पाहिला नाही कोणता रंग
हळद अंगी पाहिले यांनी जातीचे ठसे ही
सरण जेव्हा सजले जाईल माझे मसनात
देह पाहण्या येणाऱ्यांची लायकी नसे ही
किती दिवसाच दुःख पाळणार जात ही
काही दिवस यांनीच केले माझे हसे ही
