STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

2  

Amol Shinde

Tragedy

इच्छा तुझी

इच्छा तुझी

1 min
388

नाही समजलेच काही तर तक्रार कर तू

तुझ्यामुळे मरणार याचा सत्कार कर तू


प्रेमासाठी सांडले आहे रक्त माझे जरी

रक्त तुझे नाव घेईल याचा विचार कर तू


सांग कधी वागलो खोटा मी तुझ्याशी

वागलो तर वाटेल तेव्हा तिरस्कार कर तू


लोक काय म्हणतील म्हणून सोडलंस तू

आता तुझ्या विरहाचे तीर आरपार कर तू


मला आहे माहीत तू श्रीमंत घरची आहेस

हिंमत करून श्रीमंतीची हद्द पार कर तू


कळेल का कोणता शाप दिलास मला तू

एक काम कर मरणासाठी लाचार कर तू


इच्छा तुझी पूर्ण झाली सरण सजले माझे

अग्नीदाह देण्यास थोडासा अंधार कर तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy