हर्षोत्सव
हर्षोत्सव
‼️शुभ पर्व चातुर्मास
श्रावणानी सुरुवात
सणवार उत्सवांची
हिरवाई बरसात. ‼️१‼️
‼️मास अधिक श्रावण
निज श्रावणा सोबत
योग अपूर्व पर्वणी
शैव शिव,पूजा व्रत. ‼️२‼️
‼️सांब भोळा सदाशिव
प्रिय बिल्व पत्र त्यास
शिवलिलामृत ग्रंथ
कलियुगी रक्षण्यास. ‼️३‼️
‼️तिथी शुध्द पंचमीला
नाग वारुळी पूजन
पुढे नारळी पौर्णिमा
राखी,मायेचं बंधन. ‼️४‼️
‼️गौरी मंगळा पूजन
पुढं जन्माष्टमी येई
कृष्णजन्म,दहीहंडी
ओलिचिंब भिज देई. ‼️५‼️
‼️सन बैलांचा,पिठोरी
अमावस्या तिथी,पोळा
बैलांप्रती कृतज्ञता
व्यक्त करी बळी भोळा.‼️६‼️
