STORYMIRROR

Rashmi Doke

Inspirational

3  

Rashmi Doke

Inspirational

हरी रे

हरी रे

1 min
17

जितकी नाजुक तितकी मोहक

रंग रुप आकार ही सुबक

किती साजरे किती गोजिरे

रूप तुझे रे हरी.

सोंगे तू वटविलीस कितीतरी

सावळ्या...दर्शन दे कधीतरी

सावळे मोहक रूप तुझे बघोनी

सारा शीण जाये पळोनी

किती सावरे किती मोहरे

रूप तुझे रे हरी.

जरी करे तू नटखट खोड्या

परी आवडे तू मज भारी

किती हासरे.. किती बावरे

रूप तुझे रे हरी.


Rate this content
Log in

More marathi poem from Rashmi Doke

Similar marathi poem from Inspirational